शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

29 October 2010

........जीवन......!!!!

येत राहत, जात राहत, काही लाटेवरती तरंगत राहत, असंच काही आपल आयुष्य असतं!! पुन्हा एकदा कोडं................
येणारा प्रत्येक दिवस आल्यासारखा वाटत आसतो, तोपर्यंत नकळत निघून जातो जशी मुठीतून वाळू निघून जाते. आयुष्यातील काही क्षण फक्त आपण सुखाच्या किंवा दुःखाच्या हिंदोळ्यावर झुलत असतो, बाकी सर्व व्यर्थ. म्हणतात सुख आणि दुःख ह्याच जीवनाच्या दोन बाजू, पण नाही! आहे काहीतरी आहे जे या दोहोंच्या पलीकडे आहे. ज्याला सुखाची धार नाही कि दुःखाची किनार नाही, आहे फक्त संथपणा!! काय असते जीवन? खरच उमगल आहे कुणाला जीवनाचे गूढ? प्रत्येकजण आपापल्या-परीने जीवनाची परिभाषा ठरवीत असेल. कोणी आपल्या आयुष्याचे एक इप्सित ध्येय ठरवून त्यालाच आपले जीवन वाहून टाकत असेल. त्याच्यासाठी सर्व सुख, दुःख काडीसमान मानून तेच अंतिम ध्येय संबोधत असेल.
तर काहीजण दररोजच्या जीवनातील लहानसहान क्षणाचा पूरेपर उपभोग घेऊन निखळ आनंद आणि समाधान मिळवत असेल. ध्येय नसतेच असे नाही पण त्याकरिता सर्व गोष्टीचा त्याग व्यर्थ.
जस खेळ, संगीत, राजकारण, समाजसेवा किंवा उद्योग यांचे उत्युच्य शिखर हेच आपल्या जीवनाचे एकमेव कर्तव्य मानून त्याच्यामागे अव्याहतपणे पिच्छा पुरवणे. येणारा प्रत्येक दिवस, दिवसाचा प्रत्येक क्षण हा त्या कर्तव्यपूर्तीसाठी घालवणे. त्यासाठी आपले मित्र, आपले कुटुंबं यांच्याशी काही कर्तव्य असते ते विसरून किंवा पद्धतशीरपणे त्याकडे दुर्लक्ष करून आपले अंतिम एकमेव कर्तव्य पार पाडणेचा प्रयत्न करणे. प्रसिद्धीचे वलय, संपत्तीच्या लाटा यामध्ये गटांगळ्या खात वा सहजतेने तरंगत जीवनाचे मार्गक्रमण करणे. आपल्या कुटुंबाची फरपट करीत जाने. आणि मोठ्या अभिमानाने सांगणे कि हेय शिखर गाठनेसाठी मी याचा त्याग केला, याचा मनमुराद आनंद मिळवायचा टाळला कारण हे माज्या कर्तव्यपूर्तीच्या आड येत होते.
पण खरच आपले जीवन हेय फक्त आपलेच असते? कदाचित याचे उत्तर नाही असेच असेल! वृक्षाला जश्या असंख्य फांद्या असतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचे नाते असेच अनंत प्रकारे कोणा ना कोणाशी जाणते अजाणतेपणे जोडले गेलेले असते. आपल्या प्रत्येक कृतीचा त्यांच्या जीवनावर लहान मोठा फरक पडत असतो. पैसा, प्रसिद्धी हा जीवनाचा एक भाग असला तरी अंतिम सत्य नाही.
आनंद, मजा याची परिभाषा जशी व्याक्तीस्वरूप बदलत असते त्याचप्रमाणे जीवनाकडे पाहणेच दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो.
कदाचित जीवन म्हणजे काय याचा कोणाकोणाला उलगडाच होत नसेल. आपण व्यतीत केलेले आयुष्याचे क्षण हेच जीवन असेल, पण कसे व्यतीत केले हे समजणे म्हणजे जीवनार्थ कळणे होय