शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

12 October 2010

नियंत्रण

खरंच! आपल्या शरीरावर किंवा मनावर नियंत्रण असतं कोणाचं?
हे जे एक विशिष्ठ नाव धारण केलेलं आपल शरीर, आपण सर्वत्र मिरवत असतो, त्याच्या एकंदरीत कार्यावर अंकुश ठेवत कोण असतो? दैनंदिन आणि नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळे असे कार्यक्रम आपण उरकत असतो, तो साचेबद्ध चालणारा व्यवहार कोणाच्या अधिपत्याखाली चाललेला असतो? रात्री झोपल्यापासून ते पुन्हा दुसऱ्या रात्री झोपेपर्यंत क्षणाक्षणाला काही तरी घडत असते किंवा आपण काही कठीण सुलभ निर्णय घेत असतो. निर्णय घेण्यापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंत आपल्या शरीराकडून अनाहूतपणे होणाऱ्या कार्याचा उगम नेमका असतो कुठे?
वैज्ञानिक दृष्टया विचार केला तर लहान आणि मोठा मेंदू आपल्या सर्व कार्यावर एकंदरीत नियंत्रण ठेवतो. पण पुन्हा मनात प्रश्न निर्माण होतो तो जर खरोखरच शरीराच्या कार्याची सर्व हालचाली किंवा सर्व कार्यपद्धतीवर जर नियंत्रण ठेवत असेल तर अनाहूतपणे ते नियंत्रण स्वतः आपल्याकडेच आहे असे म्हणायला काय हरकत नाही. पण सारासार विचार करिता याचा पुरावा काही मिळत नाही. पुरावा नाही असे विधान अशाकरिता केले आहे कि एखादि व्यक्ती काहीतरी विचार करून कार्यास आरंभ करते पण काही केल्या विचार आणि कार्य याची सांगड लागत नाही. विचार करणारा आणि प्रत्यक्षात आणणारा व्यक्ती हि तोच आणि कृतीनंतर असे आपण ठरवले नव्हतेच असा म्हणणारा व्यक्ती हि तोच. का हा विरोधाभास?
दैनंदिन जीवनात बहुतांशी व्यक्तींना काही न काही सवयी, व्यसने, छंद असतात. या गोष्टी चांगल्या असतील असे नसतेच तेंव्हा ती व्यक्ती त्या सोडायचं प्रयत्न करते. म्हणजे ठरवते. ठरवणे हि क्रिया आपल्या मेंदूच्या सहकार्याने होते म्हणजे त्याच्याच अधिपत्याखाली होते तरीसुद्धा सर्वच व्यक्ती त्या व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही. धूम्रपानाच उदाहरण घेतलं तर बहुंताशी व्यक्ती ते सोडायचं ठरवतात, तसा संदेश ते सर्व भागापर्यंत पोहचवला जातो पण शेवटी त्या आदेशाच उल्लंघन हे शरीराचाच भागाकडून होते आणि पुन्हा एकदा धुम्रपानास सुरुवात होते. हे झाले धुम्रापानाबद्दल पण काही व्यक्तींना अशा काही सवयी असतात कि सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर त्या सवयीमुळे त्याला लज्जित व्हाव लागत जस नखे तोंडाने कुरतडणे, नाकात बोटे घालून गोल फिरविणे, सतत पायाची किंवा हाताची हालचाल करत राहणे, एखादी विशिष्ठ अशी क्रिया केल्यानंतरच प्रातःविधी साठी मोकळे होणे इत्यादी इत्यादी ......!
पण शेवटी प्रश्न हा अनुत्तरीतच राहिला जसा मागच्या प्रमाणे पुढील आयुष्यानाध्ये उत्तर शोधण्यासाठी आणि उत्तर मिळाल्यानंतर कशासाठी शोधात होतो याचे उत्तर मिळवण्यासाठी उर्वरित आयुष्य..................!