शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

16 August 2010

जीवनाच्या एका वळणावर .............

              प्रत्येकजण आपापल्या जागेवर बरोबरच. सध्यस्थितीत ज्याचीत्याची वागणूक योग्यच. पण हे तर पडसाद होते गतकाळातील जाणते अजाणते झालेल्या कर्माचे. त्या आठवणी केव्हांच स्मृतीच्या पडद्याआड झाकोळल्या गेलेल्या असतात. पण जेव्हां त्याच आठवणी काळाचा तो जाड पडदा बाजूला सारून समोर आ वासून प्रकट व्होतात तेव्हां कोण जाणे त्या देहाची काय अवस्था होत असेल.
              परिणाम चांगले किंवा वाईट, जेव्हां घटना अनपेक्षित घडते तेव्हां मनाची चलबिचल हि आपसूक आलीच. खरी कसोटी तर, जेव्हां त्या घटनेचा परिणाम म्हणून वैयक्तिक जीवनामध्ये भूचाल येवून व्यवस्थित मार्गक्रमण करीत असलेल्या संसाराची वानवा होते. व्यक्तीने तेव्हां सहनशीलता दाखवून चुकीचे परिमार्जन करून, समोरील व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याच्या सहविचाराने त्या घटनेच्या परिणामाचे शिथिलीकरण केले पाहिजे.
              खंबीर साथ, विचारांची परिपक्वता समोरील व्यक्तीला पारखण्याची जान, परिस्थितीची उकल करणेची क्षमता, थोडासा भविष्याचा वेध अशा काही गोष्टी व्यक्तीने आत्मसात करायचा प्रयत्न केला तर काय घडेल?
              खरच काही बदल घडतील या जीवनामध्ये?