शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

29 October 2010

........जीवन......!!!!

येत राहत, जात राहत, काही लाटेवरती तरंगत राहत, असंच काही आपल आयुष्य असतं!! पुन्हा एकदा कोडं................
येणारा प्रत्येक दिवस आल्यासारखा वाटत आसतो, तोपर्यंत नकळत निघून जातो जशी मुठीतून वाळू निघून जाते. आयुष्यातील काही क्षण फक्त आपण सुखाच्या किंवा दुःखाच्या हिंदोळ्यावर झुलत असतो, बाकी सर्व व्यर्थ. म्हणतात सुख आणि दुःख ह्याच जीवनाच्या दोन बाजू, पण नाही! आहे काहीतरी आहे जे या दोहोंच्या पलीकडे आहे. ज्याला सुखाची धार नाही कि दुःखाची किनार नाही, आहे फक्त संथपणा!! काय असते जीवन? खरच उमगल आहे कुणाला जीवनाचे गूढ? प्रत्येकजण आपापल्या-परीने जीवनाची परिभाषा ठरवीत असेल. कोणी आपल्या आयुष्याचे एक इप्सित ध्येय ठरवून त्यालाच आपले जीवन वाहून टाकत असेल. त्याच्यासाठी सर्व सुख, दुःख काडीसमान मानून तेच अंतिम ध्येय संबोधत असेल.
तर काहीजण दररोजच्या जीवनातील लहानसहान क्षणाचा पूरेपर उपभोग घेऊन निखळ आनंद आणि समाधान मिळवत असेल. ध्येय नसतेच असे नाही पण त्याकरिता सर्व गोष्टीचा त्याग व्यर्थ.
जस खेळ, संगीत, राजकारण, समाजसेवा किंवा उद्योग यांचे उत्युच्य शिखर हेच आपल्या जीवनाचे एकमेव कर्तव्य मानून त्याच्यामागे अव्याहतपणे पिच्छा पुरवणे. येणारा प्रत्येक दिवस, दिवसाचा प्रत्येक क्षण हा त्या कर्तव्यपूर्तीसाठी घालवणे. त्यासाठी आपले मित्र, आपले कुटुंबं यांच्याशी काही कर्तव्य असते ते विसरून किंवा पद्धतशीरपणे त्याकडे दुर्लक्ष करून आपले अंतिम एकमेव कर्तव्य पार पाडणेचा प्रयत्न करणे. प्रसिद्धीचे वलय, संपत्तीच्या लाटा यामध्ये गटांगळ्या खात वा सहजतेने तरंगत जीवनाचे मार्गक्रमण करणे. आपल्या कुटुंबाची फरपट करीत जाने. आणि मोठ्या अभिमानाने सांगणे कि हेय शिखर गाठनेसाठी मी याचा त्याग केला, याचा मनमुराद आनंद मिळवायचा टाळला कारण हे माज्या कर्तव्यपूर्तीच्या आड येत होते.
पण खरच आपले जीवन हेय फक्त आपलेच असते? कदाचित याचे उत्तर नाही असेच असेल! वृक्षाला जश्या असंख्य फांद्या असतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचे नाते असेच अनंत प्रकारे कोणा ना कोणाशी जाणते अजाणतेपणे जोडले गेलेले असते. आपल्या प्रत्येक कृतीचा त्यांच्या जीवनावर लहान मोठा फरक पडत असतो. पैसा, प्रसिद्धी हा जीवनाचा एक भाग असला तरी अंतिम सत्य नाही.
आनंद, मजा याची परिभाषा जशी व्याक्तीस्वरूप बदलत असते त्याचप्रमाणे जीवनाकडे पाहणेच दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो.
कदाचित जीवन म्हणजे काय याचा कोणाकोणाला उलगडाच होत नसेल. आपण व्यतीत केलेले आयुष्याचे क्षण हेच जीवन असेल, पण कसे व्यतीत केले हे समजणे म्हणजे जीवनार्थ कळणे होय

22 October 2010

मती जिथ गहन पडते


                                                          या माणसाला काय म्हणायचं तेच समजत नाही?  मुंबई वर हमाला झालेल्या रात्री मित्राच्या पार्टीत नाचणारा हा आम्हाला शहाणपणा शिकवतोय. म्हणे आम्ही महाराष्ट्रीय लोक आळशी आहोत, आम्ही झोपतो आणि सगळी काम बिहारी करत असतात, बरोबरच आहे  दिवसभर इमानाने काम केल्यावर रात्री आम्ही झोपतो आणि याची बिहारी पिलावळ रात्री चोऱ्या आणि दरोडे घालते. म्हणतोय तरी काय उत्तर भारतीय आणि हिंदुस्थानी लोकच मेट्रो सारख्या प्रकल्पावर काम करताहेत याचा अर्थ काय तर आम्ही महाराष्ट्रीय लोक एक तर भारतीय नाही आणि भारत फक्त त्या उत्तर भारतापुरता मर्यादित आहे. मग कशाला तोंड वर करून हिकड मरायला येताय. काय काबाड कष्ट करायचं ते तिथ बिहारात आणि उत्तर भारतात करा की. अरे ज्या लोकसभा मतदार संघातून याचं आख्खं खानदान निवडून येत आलंय त्या उत्तरप्रदेशातील मतदार संघाचा याला उत्कर्ष करता आला नाही आणि निवडणूक आल्यावर त्याच उत्तर भारतीयांची बाजू घेऊन सांगतोय तेच कष्ट करताहेत म्हणून तर आम्ही उभे आहोत. असेल जर दम दाखव म्हणाव उत्तर प्रदेश आणि बिहारला वर आणून. अरे गांधी आडनाव म्हणून लोक तुला थोडेफार ओळखतात नाही तर राहुल नामक व्यक्ती त्याच बिहाऱ्यासांरखी कुठेतरी काबाड कष्ट करीत असली असती.
                                                          धर्मनिरपेक्ष म्हणून धर्माचा राजकारण करणारा पक्ष, तुमच्याकडून अपेक्षा तरी काय करायची.

13 October 2010

काहीस मनातलं.............

आज मी अभियांत्रिकी मधील पदवी घेऊन एका नामांकीत उद्योग-समूहामध्ये नोकरी करीत आहे. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत कधीही मला अभ्यास आवडला नाही. अभ्यास केला तो फक्त परीक्षेच्या भीतीपोटी. आणि परिस्थितीची जाणीव असल्यामुळेच. इथे "आणि" हा शब्द वापरला आहे कारण दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या. परीक्षेची भीती याकरिता, कारण भरपूर गुण मिळवणे आवश्यक होते आणि भरपूर गुण हे उज्ज्वल भवितव्यासाठी हवे होते. प्रत्येक मनुष्याकडे काहीतरी उपजत गुण, कौशल्य असतात, पण काही लोकच त्या उपजत कौशल्याचा उपयोग करून घेऊन आयुष्यात काही करू शकतात. मात्र योग्य शिक्षण घेतलेल्या पैकी बहुतांशी लोक हे प्रगतीपथावर मार्गक्रमन करतात. हे आमच्या मनात ठासून भरलेले होते, कोण आणि कुणी मनामध्ये भरवलं हे आमच्या खिजगणतीतही नव्हते. तसं आमच्याकडे वेगळ, काही वैशिष्ठपूर्ण असं नव्हतंच त्यामुळे आम्ही अभ्यास एक्के अभ्यास करायचं ठरवलं. म्हंटल तर अभ्यास करायला आम्हाला आवडत होत, म्हंटल तर नव्हतं. याच असं कि विज्ञान, बीज-गणित, भूमिती असे विषय आमच्या आवडीचे तर भाषा, इतिहास, कला असे विषय आमच्या नावडीचे. पण परीक्षेत चांगले गुण हवेत तर सगळ्या विषयांचा अभ्यास हा केलाच पाहिजे. त्यामुळे अनासाये इतर विषय देखील आम्ही जबरदस्तीने अभ्यासायचो.
वर सांगितल्या प्रमाणे परीक्षेची भीती वाटायची, प्रत्यक्षात आम्हाला भीती वाटायची ती म्हणजे परीक्षेनंतर येणाऱ्या निकालाची. तसा अभ्यास आम्ही जोर लावूनच करायचो अन प्रश्नपत्रिका देखील जोरातच सोडवायचो. उत्तीर्ण होण हे अपेक्षित होत पण किती गुणांनी आणि कोणत्या क्रमांकाने हे महत्वाचे होत. कारण निकालाबरोबर होत ते अपक्षांचे ओझे. अपेक्षा फक्त इतरांच्या नव्हे, तर जास्त अपेक्षा ह्या स्वतःच्या स्वतःकडूनच होत्या. इतरांच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही त्याला समर्पक उत्तर देऊ शकाल पण स्वतःच्या अपेक्षापूर्ती नाही झाल्या तर मात्र काही खैर नाही कारण अपेक्षा करणारे आणि अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ असे दोन्ही फक्त आपणच असतो. दोघांच्या समोरच सगळ घडलेलं असत तेंव्हा कारणीमींमासा व्यर्थच. फसवणारा आणि फसवून घेणारा दोन्ही आपणच असतो.
वर बोलल्याप्रमाणे काही विषयांचा अभ्यास आम्ही जबरदस्तीने करायचो पण याच अर्थ असं नव्हे कि फक्त घोकंपट्टी करायचो. नाही प्रत्येक विषय आम्ही योग्यच अभ्यासला, कारण पाया मजबूत तरच इमारत घट्ट उभी राहते. या उक्तीप्रमाणेच आम्ही प्रत्येक घटक, त्यामागील गमक शोधून मगच पुढे गेलो. पण कधीही आम्ही अपेक्षांना खरे उतरलो नाही न स्वतःच्या ना इतरांच्या. याबद्दल इतरांचं काय मत हे माहित नाही पण हे मात्र नक्की कि नेहमीच आम्ही स्वतःच्या नजरेत कधीच भरलो नाही. प्रत्येक वर्गात योग्य गुणांनी उत्तीर्ण होत गेलो यातच काय ते समाधान पण वेगळ असं काही आमच्याकडून काही घडले नाही जे बऱ्याच लोकानी आमच्याकडून अपेक्षित केल होत. दहावी अशीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पदविके साठी प्रवेश घेतला आणि कोल्हापूरशी थोडी जवळीक निर्माण झाली. पूर्वीपासूनच का कोणास ठावूक कोल्हापूर बद्दल एक आपुलकी वाटत होती, ती या तीन वर्षात आणखीन घट्ट झाली. पदविकेचा अभ्यासक्रम देखील तीन वर्षात पूर्ण झाला. तीन वर्षात काय अनुभवयास मिळाल ते म्हणजे तेथील लोकांची हरभराच्या झाडावर चढवण्याची प्रवृत्ती. जे जिथ नसतच ते तिथ कसा आणायचं आणि समोरच्या व्यक्तीच्या गळी कस उतरवायचं ते शिकावं ते फक्त इथंच.
पदाविकेनंतर प्रवेश झाला तो पदवीच्या शिक्षणासाठी. जयसिंगपूरमध्ये मग आम्ही पुढील शिक्षणास सुरुवात केली. आणखी तीन वर्षे. म्हंटली तर होती मागील तीन वर्षाची उजळणी म्हंटली तर होती थोडीशी एक पायरी वर. इथेही आम्ही आत्तापर्यंत होतो तसाच थोडासा शांतच होतो. नाही म्हणायला आमची बडबड चालायची ती पण जवळच्या थोड्या मित्रांबरोबरच. उर्वरित सर्व ठिकाणी आम्ही मात्र मौन व्रतच घेतलेलं असायचं. पदविका आणि पदवी शिक्षण होई पर्यंत एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मी थोड्याच लोकांना ओळखायचो आणि त्याहूनही थोडी लोक मला ओळखायचे. बघता बघता हि देखील तीन वर्षे संपली आणि ज्या जाणीवेतून हे शिक्षण घेतले त्या जाणीवेला जाणून द्यायची वेळ झाली होती कि नाही आहे आजून पण तुझी मला जान आहे.
एवढ मात्र नक्की या पूर्ण प्रवासामध्ये मला कशाची कमी भासली नाही, जे ओंजळी भरून भरून मला दिल गेल ते म्हणजे प्रेम, आपुलकी. दुसर काही नसलं तरी चालेल मात्र या एका गोष्टीवर माणूस नक्कीच तरून जातो आणि तेच मला माझ्या आयुष्यामध्ये कधीही कमी पडलेलं नाही. मला भरभरून जे दिल गेल त्याची परत फेड होतेय, नाही होतेय याची खंत किंवा एक जाणीव मनामध्ये राहूनराहून येते पण अनेक प्रश्नाप्रमाणे अनुत्तरीतच राहून जाते...............................................................

12 October 2010

नियंत्रण

खरंच! आपल्या शरीरावर किंवा मनावर नियंत्रण असतं कोणाचं?
हे जे एक विशिष्ठ नाव धारण केलेलं आपल शरीर, आपण सर्वत्र मिरवत असतो, त्याच्या एकंदरीत कार्यावर अंकुश ठेवत कोण असतो? दैनंदिन आणि नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळे असे कार्यक्रम आपण उरकत असतो, तो साचेबद्ध चालणारा व्यवहार कोणाच्या अधिपत्याखाली चाललेला असतो? रात्री झोपल्यापासून ते पुन्हा दुसऱ्या रात्री झोपेपर्यंत क्षणाक्षणाला काही तरी घडत असते किंवा आपण काही कठीण सुलभ निर्णय घेत असतो. निर्णय घेण्यापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंत आपल्या शरीराकडून अनाहूतपणे होणाऱ्या कार्याचा उगम नेमका असतो कुठे?
वैज्ञानिक दृष्टया विचार केला तर लहान आणि मोठा मेंदू आपल्या सर्व कार्यावर एकंदरीत नियंत्रण ठेवतो. पण पुन्हा मनात प्रश्न निर्माण होतो तो जर खरोखरच शरीराच्या कार्याची सर्व हालचाली किंवा सर्व कार्यपद्धतीवर जर नियंत्रण ठेवत असेल तर अनाहूतपणे ते नियंत्रण स्वतः आपल्याकडेच आहे असे म्हणायला काय हरकत नाही. पण सारासार विचार करिता याचा पुरावा काही मिळत नाही. पुरावा नाही असे विधान अशाकरिता केले आहे कि एखादि व्यक्ती काहीतरी विचार करून कार्यास आरंभ करते पण काही केल्या विचार आणि कार्य याची सांगड लागत नाही. विचार करणारा आणि प्रत्यक्षात आणणारा व्यक्ती हि तोच आणि कृतीनंतर असे आपण ठरवले नव्हतेच असा म्हणणारा व्यक्ती हि तोच. का हा विरोधाभास?
दैनंदिन जीवनात बहुतांशी व्यक्तींना काही न काही सवयी, व्यसने, छंद असतात. या गोष्टी चांगल्या असतील असे नसतेच तेंव्हा ती व्यक्ती त्या सोडायचं प्रयत्न करते. म्हणजे ठरवते. ठरवणे हि क्रिया आपल्या मेंदूच्या सहकार्याने होते म्हणजे त्याच्याच अधिपत्याखाली होते तरीसुद्धा सर्वच व्यक्ती त्या व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही. धूम्रपानाच उदाहरण घेतलं तर बहुंताशी व्यक्ती ते सोडायचं ठरवतात, तसा संदेश ते सर्व भागापर्यंत पोहचवला जातो पण शेवटी त्या आदेशाच उल्लंघन हे शरीराचाच भागाकडून होते आणि पुन्हा एकदा धुम्रपानास सुरुवात होते. हे झाले धुम्रापानाबद्दल पण काही व्यक्तींना अशा काही सवयी असतात कि सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर त्या सवयीमुळे त्याला लज्जित व्हाव लागत जस नखे तोंडाने कुरतडणे, नाकात बोटे घालून गोल फिरविणे, सतत पायाची किंवा हाताची हालचाल करत राहणे, एखादी विशिष्ठ अशी क्रिया केल्यानंतरच प्रातःविधी साठी मोकळे होणे इत्यादी इत्यादी ......!
पण शेवटी प्रश्न हा अनुत्तरीतच राहिला जसा मागच्या प्रमाणे पुढील आयुष्यानाध्ये उत्तर शोधण्यासाठी आणि उत्तर मिळाल्यानंतर कशासाठी शोधात होतो याचे उत्तर मिळवण्यासाठी उर्वरित आयुष्य..................!