शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

30 August 2010

वादळ................?

एक वादळ उठलंय मनामध्ये,
म्हंटल शमवू त्या वादळाला,
उभी करून विचारांची अजोड भिंत आडवी त्याला,
एक एक पाय घट्ट रोऊन, तोंड देऊ त्या वादळाला,
करू शर्थीचे प्रयत्न आणि थोपउ त्या वादळाला,
पण राहून राहून येतो एकाच विचार मनामध्ये,
चाललोय मोठ्या हिंमतीन, तोंड द्यायला त्या वादळाला,
पण व्यर्थ ते सर्व, न उमगे दिशा त्या वादळाची,
न समजे ते वादळ कसले,
विचारांचे काहूर माजलेय, दिशाहीन, ध्येयहीन भरकटतेय,
गावावर सोडलेल्या वळूप्रमाणे हुंदडतय ते,
राहून राहून शोधतेय एकाच उत्तर, मिळणार का मज ते ध्येय,
मग उठेल असेच एक वादळ,उद्दात्त त्या ध्येयासाठी,
का असेच उठणार वादळ आयुष्यामध्ये,
सदैव तयार पुसण्यासाठी, पाऊलखुणा त्या जीवन रेतीवरील.

25 August 2010

आणखी एक कोडे...............?

मनुष्यप्राणी! म्हणे सर्वात बुद्धिमान प्राणी! स्मृतीदेखील विलक्षण, समाजप्रिय प्राणी.
पण का बर ह्याच प्रत्यंतर सहसा मिळत नाही?
का बर काही कालावधीतच मनुष्यच मनुष्याच्या विस्मृतीत जातो?
जाणते अजाणते थोड्याफार काळात मनुष्य आपल्या गतकाळाच्या सर्व मृत-जीविताना मूठमाती देऊन समोर येऊ घातलेल्या नवीन मृत-जीविताना आपलासे करतो.
असं समजावं का, की ते स्मृतीपल्याड गेलेले ते कदाचित त्याला भावले नसतील, कधी आपलेसे वाटली नसतील. पण तसं तरी कधी जाणवलं नाही. ज्याच्याबरोबर आयुष्याची काही वर्षे व्यतीत केली असतील, जरी सगळेच भावले नसले तरी थोडे तरी त्याच्या जवळचे असतील तरीदेखील का हि विस्मृती?
आणखी एक कोडे...............?
पुढील आयुष्यात उत्तर शोधण्यासाठी.......

16 August 2010

जीवनाच्या एका वळणावर .............

              प्रत्येकजण आपापल्या जागेवर बरोबरच. सध्यस्थितीत ज्याचीत्याची वागणूक योग्यच. पण हे तर पडसाद होते गतकाळातील जाणते अजाणते झालेल्या कर्माचे. त्या आठवणी केव्हांच स्मृतीच्या पडद्याआड झाकोळल्या गेलेल्या असतात. पण जेव्हां त्याच आठवणी काळाचा तो जाड पडदा बाजूला सारून समोर आ वासून प्रकट व्होतात तेव्हां कोण जाणे त्या देहाची काय अवस्था होत असेल.
              परिणाम चांगले किंवा वाईट, जेव्हां घटना अनपेक्षित घडते तेव्हां मनाची चलबिचल हि आपसूक आलीच. खरी कसोटी तर, जेव्हां त्या घटनेचा परिणाम म्हणून वैयक्तिक जीवनामध्ये भूचाल येवून व्यवस्थित मार्गक्रमण करीत असलेल्या संसाराची वानवा होते. व्यक्तीने तेव्हां सहनशीलता दाखवून चुकीचे परिमार्जन करून, समोरील व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याच्या सहविचाराने त्या घटनेच्या परिणामाचे शिथिलीकरण केले पाहिजे.
              खंबीर साथ, विचारांची परिपक्वता समोरील व्यक्तीला पारखण्याची जान, परिस्थितीची उकल करणेची क्षमता, थोडासा भविष्याचा वेध अशा काही गोष्टी व्यक्तीने आत्मसात करायचा प्रयत्न केला तर काय घडेल?
              खरच काही बदल घडतील या जीवनामध्ये?

02 August 2010

वैचारिक वाटचाल
१ ऑगस्ट, बहुतांशी लोकांनी साजरा केला तो फ्रेंडशिप डे म्हणूनच. बरयाच लोकांना जरी विचारलं तरी सांगता येणार नाही तरी पण एक प्रथा किंवा एक (अंधा) अनुकरण म्हणून साजरा केला तो दिवस.
नाही साजरी केली ती एका जहाल स्वातंत्र्य सेनानिची पुण्यतिथी. कोण होती ती व्यक्ती हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक, जहाल विचारवादी, सार्वजनिक गणेशउत्सवाचे प्रणेते श्री बाल गंगाधर टिळक.
थोडी फार वाटतेय का नाही आजूनपण ..............! थोड वाकून बघा तुमच्या मनामध्ये, आत्मकेंद्रित होऊन जरा विचार करा नक्की आपल्याला जायचं कुठ आणि चाललोय कुठ?