शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

30 August 2010

वादळ................?

एक वादळ उठलंय मनामध्ये,
म्हंटल शमवू त्या वादळाला,
उभी करून विचारांची अजोड भिंत आडवी त्याला,
एक एक पाय घट्ट रोऊन, तोंड देऊ त्या वादळाला,
करू शर्थीचे प्रयत्न आणि थोपउ त्या वादळाला,
पण राहून राहून येतो एकाच विचार मनामध्ये,
चाललोय मोठ्या हिंमतीन, तोंड द्यायला त्या वादळाला,
पण व्यर्थ ते सर्व, न उमगे दिशा त्या वादळाची,
न समजे ते वादळ कसले,
विचारांचे काहूर माजलेय, दिशाहीन, ध्येयहीन भरकटतेय,
गावावर सोडलेल्या वळूप्रमाणे हुंदडतय ते,
राहून राहून शोधतेय एकाच उत्तर, मिळणार का मज ते ध्येय,
मग उठेल असेच एक वादळ,उद्दात्त त्या ध्येयासाठी,
का असेच उठणार वादळ आयुष्यामध्ये,
सदैव तयार पुसण्यासाठी, पाऊलखुणा त्या जीवन रेतीवरील.