शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

12 October 2010

नियंत्रण

खरंच! आपल्या शरीरावर किंवा मनावर नियंत्रण असतं कोणाचं?
हे जे एक विशिष्ठ नाव धारण केलेलं आपल शरीर, आपण सर्वत्र मिरवत असतो, त्याच्या एकंदरीत कार्यावर अंकुश ठेवत कोण असतो? दैनंदिन आणि नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळे असे कार्यक्रम आपण उरकत असतो, तो साचेबद्ध चालणारा व्यवहार कोणाच्या अधिपत्याखाली चाललेला असतो? रात्री झोपल्यापासून ते पुन्हा दुसऱ्या रात्री झोपेपर्यंत क्षणाक्षणाला काही तरी घडत असते किंवा आपण काही कठीण सुलभ निर्णय घेत असतो. निर्णय घेण्यापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंत आपल्या शरीराकडून अनाहूतपणे होणाऱ्या कार्याचा उगम नेमका असतो कुठे?
वैज्ञानिक दृष्टया विचार केला तर लहान आणि मोठा मेंदू आपल्या सर्व कार्यावर एकंदरीत नियंत्रण ठेवतो. पण पुन्हा मनात प्रश्न निर्माण होतो तो जर खरोखरच शरीराच्या कार्याची सर्व हालचाली किंवा सर्व कार्यपद्धतीवर जर नियंत्रण ठेवत असेल तर अनाहूतपणे ते नियंत्रण स्वतः आपल्याकडेच आहे असे म्हणायला काय हरकत नाही. पण सारासार विचार करिता याचा पुरावा काही मिळत नाही. पुरावा नाही असे विधान अशाकरिता केले आहे कि एखादि व्यक्ती काहीतरी विचार करून कार्यास आरंभ करते पण काही केल्या विचार आणि कार्य याची सांगड लागत नाही. विचार करणारा आणि प्रत्यक्षात आणणारा व्यक्ती हि तोच आणि कृतीनंतर असे आपण ठरवले नव्हतेच असा म्हणणारा व्यक्ती हि तोच. का हा विरोधाभास?
दैनंदिन जीवनात बहुतांशी व्यक्तींना काही न काही सवयी, व्यसने, छंद असतात. या गोष्टी चांगल्या असतील असे नसतेच तेंव्हा ती व्यक्ती त्या सोडायचं प्रयत्न करते. म्हणजे ठरवते. ठरवणे हि क्रिया आपल्या मेंदूच्या सहकार्याने होते म्हणजे त्याच्याच अधिपत्याखाली होते तरीसुद्धा सर्वच व्यक्ती त्या व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही. धूम्रपानाच उदाहरण घेतलं तर बहुंताशी व्यक्ती ते सोडायचं ठरवतात, तसा संदेश ते सर्व भागापर्यंत पोहचवला जातो पण शेवटी त्या आदेशाच उल्लंघन हे शरीराचाच भागाकडून होते आणि पुन्हा एकदा धुम्रपानास सुरुवात होते. हे झाले धुम्रापानाबद्दल पण काही व्यक्तींना अशा काही सवयी असतात कि सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर त्या सवयीमुळे त्याला लज्जित व्हाव लागत जस नखे तोंडाने कुरतडणे, नाकात बोटे घालून गोल फिरविणे, सतत पायाची किंवा हाताची हालचाल करत राहणे, एखादी विशिष्ठ अशी क्रिया केल्यानंतरच प्रातःविधी साठी मोकळे होणे इत्यादी इत्यादी ......!
पण शेवटी प्रश्न हा अनुत्तरीतच राहिला जसा मागच्या प्रमाणे पुढील आयुष्यानाध्ये उत्तर शोधण्यासाठी आणि उत्तर मिळाल्यानंतर कशासाठी शोधात होतो याचे उत्तर मिळवण्यासाठी उर्वरित आयुष्य..................!

30 September 2010

देश माझा मोठा

देश माझा मोठा भारत त्याचं नाव,
सकल जगतात धर्मनिरपेक्ष म्हणून भाव,
पण राजकीय पंक्षाचा येथे वेगळाच डाव,
पदोपदी जनतेच्या मनावर घालतात जातीचाच घाव....!

18 September 2010

काय करावे.................

काय करावे ते सुचत नाही,
अन सुचाल्याशिवाय काही करवित नाही,
दोहोंच्या द्वंद्वामध्ये मी मात्र शांत आहे,
ना सुचत आहे, ना करत आहे..............!

30 August 2010

वादळ................?

एक वादळ उठलंय मनामध्ये,
म्हंटल शमवू त्या वादळाला,
उभी करून विचारांची अजोड भिंत आडवी त्याला,
एक एक पाय घट्ट रोऊन, तोंड देऊ त्या वादळाला,
करू शर्थीचे प्रयत्न आणि थोपउ त्या वादळाला,
पण राहून राहून येतो एकाच विचार मनामध्ये,
चाललोय मोठ्या हिंमतीन, तोंड द्यायला त्या वादळाला,
पण व्यर्थ ते सर्व, न उमगे दिशा त्या वादळाची,
न समजे ते वादळ कसले,
विचारांचे काहूर माजलेय, दिशाहीन, ध्येयहीन भरकटतेय,
गावावर सोडलेल्या वळूप्रमाणे हुंदडतय ते,
राहून राहून शोधतेय एकाच उत्तर, मिळणार का मज ते ध्येय,
मग उठेल असेच एक वादळ,उद्दात्त त्या ध्येयासाठी,
का असेच उठणार वादळ आयुष्यामध्ये,
सदैव तयार पुसण्यासाठी, पाऊलखुणा त्या जीवन रेतीवरील.

25 August 2010

आणखी एक कोडे...............?

मनुष्यप्राणी! म्हणे सर्वात बुद्धिमान प्राणी! स्मृतीदेखील विलक्षण, समाजप्रिय प्राणी.
पण का बर ह्याच प्रत्यंतर सहसा मिळत नाही?
का बर काही कालावधीतच मनुष्यच मनुष्याच्या विस्मृतीत जातो?
जाणते अजाणते थोड्याफार काळात मनुष्य आपल्या गतकाळाच्या सर्व मृत-जीविताना मूठमाती देऊन समोर येऊ घातलेल्या नवीन मृत-जीविताना आपलासे करतो.
असं समजावं का, की ते स्मृतीपल्याड गेलेले ते कदाचित त्याला भावले नसतील, कधी आपलेसे वाटली नसतील. पण तसं तरी कधी जाणवलं नाही. ज्याच्याबरोबर आयुष्याची काही वर्षे व्यतीत केली असतील, जरी सगळेच भावले नसले तरी थोडे तरी त्याच्या जवळचे असतील तरीदेखील का हि विस्मृती?
आणखी एक कोडे...............?
पुढील आयुष्यात उत्तर शोधण्यासाठी.......

16 August 2010

जीवनाच्या एका वळणावर .............

              प्रत्येकजण आपापल्या जागेवर बरोबरच. सध्यस्थितीत ज्याचीत्याची वागणूक योग्यच. पण हे तर पडसाद होते गतकाळातील जाणते अजाणते झालेल्या कर्माचे. त्या आठवणी केव्हांच स्मृतीच्या पडद्याआड झाकोळल्या गेलेल्या असतात. पण जेव्हां त्याच आठवणी काळाचा तो जाड पडदा बाजूला सारून समोर आ वासून प्रकट व्होतात तेव्हां कोण जाणे त्या देहाची काय अवस्था होत असेल.
              परिणाम चांगले किंवा वाईट, जेव्हां घटना अनपेक्षित घडते तेव्हां मनाची चलबिचल हि आपसूक आलीच. खरी कसोटी तर, जेव्हां त्या घटनेचा परिणाम म्हणून वैयक्तिक जीवनामध्ये भूचाल येवून व्यवस्थित मार्गक्रमण करीत असलेल्या संसाराची वानवा होते. व्यक्तीने तेव्हां सहनशीलता दाखवून चुकीचे परिमार्जन करून, समोरील व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याच्या सहविचाराने त्या घटनेच्या परिणामाचे शिथिलीकरण केले पाहिजे.
              खंबीर साथ, विचारांची परिपक्वता समोरील व्यक्तीला पारखण्याची जान, परिस्थितीची उकल करणेची क्षमता, थोडासा भविष्याचा वेध अशा काही गोष्टी व्यक्तीने आत्मसात करायचा प्रयत्न केला तर काय घडेल?
              खरच काही बदल घडतील या जीवनामध्ये?

02 August 2010

वैचारिक वाटचाल
१ ऑगस्ट, बहुतांशी लोकांनी साजरा केला तो फ्रेंडशिप डे म्हणूनच. बरयाच लोकांना जरी विचारलं तरी सांगता येणार नाही तरी पण एक प्रथा किंवा एक (अंधा) अनुकरण म्हणून साजरा केला तो दिवस.
नाही साजरी केली ती एका जहाल स्वातंत्र्य सेनानिची पुण्यतिथी. कोण होती ती व्यक्ती हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक, जहाल विचारवादी, सार्वजनिक गणेशउत्सवाचे प्रणेते श्री बाल गंगाधर टिळक.
थोडी फार वाटतेय का नाही आजूनपण ..............! थोड वाकून बघा तुमच्या मनामध्ये, आत्मकेंद्रित होऊन जरा विचार करा नक्की आपल्याला जायचं कुठ आणि चाललोय कुठ?

22 July 2010

जाणीव

एक अनामिक भीती वाटतेय, पदोपदी एकटेपणाची जाणीव होतेय!
बंर, म्हंटल बघू तरी नक्की वाटतेय कशाची भीती,
पण सापडलंच तर ती भीती कसली अन आम्ही मानस कसली!!!!!!

03 July 2010


आठवणी न विसरू शकतो , न पकडून ठेऊ शकतो,
बरया न झालेल्या जखमेवरील खपली प्रमाणे, आठवणी हि दुखरया असतात,
खपली निघाली कि, भळाभळा रक्त वाहू लागते, अन टचकन डोळ्यात आसव आणत,
आठवणी, सुखद व दुखद क्षणाच्या, आल्याच; तर आहेच भळाभळा वाहने आश्रुंचे,
नयनातुनी आमच्या, परी! परवडले ते वहाणे रक्ताचे जखमेतुनी .